Fri, Jul 19, 2019 05:21होमपेज › Konkan ›  रेल्वे प्रकल्पग्रस्त आक्रमक

 रेल्वे प्रकल्पग्रस्त आक्रमक

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 11:03PMरत्नागिरी : प्रतिनिधी

बहुचर्चित जयगड-डिंगणी रेल्वेमार्गावरील काम घेणार्‍या ठेकेदार कंपनीविरोधात देऊडवासीय आक्रमक झाले आहेत. ठेकेदार कंपनीकडून स्थानिकांवर अन्याय होत असल्याने ग्रामस्थ ठेकेदार कार्यालयावर पोहोचल्यानंतर हे कार्यालय बंद करून अधिकार्‍यांनी पोबारा केला. ही घटना रविवारी दुपारी घडली. 

जेएसडब्ल्यूतर्फे खासगी विकसकातर्फे जयगड-डिंगणी रेल्वेमार्ग प्रकल्पाची पूर्तता करण्यात येत आहे. हा प्रकल्प सर्वाधिक बोगद्यातून जात आहे. देऊड येथे प्रकल्पग्रस्तांना योग्य वागणूक मिळत नसून, ठेका घेतलेल्या कंपनीच्या अधिकार्‍यांकडून स्थानिकांची गळचेपी होत आहे. येथील प्रकल्पग्रस्त जमीनमालकांना ठेकेदार कंपनीकडून नोकरी व विविध कामांमध्ये प्राथमिकता देण्याचे करार झाले आहेत.

मात्र, याबाबत कंपनीकडून दुजाभाव केला जात आहे. प्रकल्पबाधित जमिनींच्या मालकांना अन्यत्र गाठून, दबावतंत्र वापरून या प्रकल्पाच्या जागा घेण्याचा सपाटा लावला आहे. जे मालक  जागा देण्याबाबत ताठर भूमिका घेत आहेत त्यांच्यावर विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.