Thu, Jun 27, 2019 09:39होमपेज › Konkan › कांद्याने आणले डोळ्यात पाणी

कांद्याने आणले डोळ्यात पाणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

अवकाळी पावसामुळे एकीकडे भाज्यांचे दर कडाडले असतानाच कांद्याच्या वाढत्या दरानेही सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांद्याचे दर कमी होण्याऐवजी वाढत जाऊन प्रति किलो 60 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. 

या महागड्या कांद्याचा दर्जाही ओलसर, काळपट असून, या कांद्याने चांगलेच रडवले. कांद्याची सर पातीची भाजी घेऊन काढावी तर ती सोयसुद्धा राहिली नाही. भाज्यांच्या चढ्या दराची लागण कांद्याच्या पातीलाही झाल्याने तीस रुपयाला मिळणारी पात कांद्यापेक्षा अधिक जहाल झाली आहे. कांदाभजी खाण्याचा सोसही परवडणारा नाही. कांदाभजीतून कांदाच गुल झाला असून, त्याची जागा कोबीने घेतली आहे. 

घाऊक बाजारामध्ये थंडीच्या मोसमात कांदा साठवून ठेवल्याने त्याला ओल धरत आहे. ओल लागलेला कांदाही चढ्या दरात विकला जात आहे. परतीच्या पावसाने यंदा कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा ओला असल्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.