Fri, Nov 16, 2018 17:44होमपेज › Konkan › पॉवरफ्टिंगमध्ये रत्नागिरीला चार पदके

पॉवरफ्टिंगमध्ये रत्नागिरीला चार पदके

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 10:05PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ज्युनियर महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धा नुकत्याच महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, एल्फिन्स्टन, मुंबई येथे झाल्या. या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकाची कमाई करत देदिप्यमान कामगिरी केली आहे.  तेजस्विनी सावंत (72 कि. सुवर्णपदक), नेहा नेने (63 कि. रौप्य पदक), आदिती शिर्के (57 कि. कांस्य पदक), लावण्या समसानी (84 कि. कांस्यपदक), रक्षंदा पाटील (+84 कांस्यपदक) यांनी या स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे.  

या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी रत्नागिरी जिल्हा महिला पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संघातून महाराष्ट्र राज्य ज्युनियर महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा महिला पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संघाला सांघिक उपविजेतेपद प्राप्त झाले होते.

महाविद्यालयाच्या खो-खो संघाला क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन आणि  प्रा. ओंकार बाणे, कमलेश लाड, श्री. वैभव हंजनकर आणि योगीता बनप तसेच रत्नागिरी जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सेक्रेटरी  मदन भास्करे यांचे सहकार्य लाभले. 

या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन,  कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर आणि सर्व सदस्य तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तीनही विभागांचे उपप्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी व सेवक वर्ग यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.