Fri, Apr 26, 2019 00:00होमपेज › Konkan › प्रथमेश, अनुजाला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण

प्रथमेश, अनुजाला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण

Published On: Dec 13 2017 1:56AM | Last Updated: Dec 12 2017 8:59PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : क्रीडा प्रतिनिधी

 मुंबई विद्यापीठ आयोजित आंतर विभागीय महाविद्यालय वेटलिफ्टिंग मुले व मुली स्पर्धेत  कळंबोली नवी मुंबई येथे पार पडल्या. वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात  रत्नागिरीच्या प्रथमेश पावसकर व अनुजा सावंत हिने सुवर्णपदक पटकावले.) हेगशेट्ये महाविद्यालय रत्नागिरीचा विद्यार्थी प्रथमेश पावसकर याने 105 किलो वजनी गटात स्नॅचला 80 किलो, क्लीन अँड जर्कला 97 किलो असे एकूण 177 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. त्याचे क्रीडा शिक्षक स्वप्नील सावंत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 

सामंत महाविद्यालय पाली, रत्नागिरीच्या अनुजा सावंत हिने 90 किलो वजनी गटात स्नॅचला 45 किलो, क्लिन अँड जर्कला 60 किलो असे एकूण 105 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तिला क्रीडा शिक्षक शैलेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.  हे दोन्ही विद्यार्थी फिनिक्स हेल्थ क्लब जीम जयस्तंभ रत्नागिरी येथे सराव करतात. त्यांचे प्रशिक्षक राज नेवरेकर यांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे या दोघांनीही पुढारीशी बोलताना सांगितले.