Tue, Mar 26, 2019 01:35होमपेज › Konkan › जखमी हल्लेखोरास मुंबईला हलवले

जखमी हल्लेखोरास मुंबईला हलवले

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 09 2018 11:23PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला करणार्‍या  जखमी तरुणाला अधिक उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. मुलीवर हल्ला केल्यानंतर या घटनेतील तरुणाने स्वतःवरही चाकूने वार करून घेतले होते. ही घटना सोमवारी संगमेश्‍वर तालुक्यातील माखजन येथे घडली होती.

रोशन भीमदास कदम (21) असे तरुणाचे नाव आहे. रोशन तसेच आणि या घटनेतील अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांमध्ये संबंध चांगले होते. यातूनच त्यांच्यात मैत्री झाली होती. वर्षभरापूर्वी रोशनने या मुलीला प्रेमाबद्दल विचारणा केली होती. त्याला तिचा विरोध होता. दरम्यान, तो तिला सतत दूरध्वनी करायचा, तसेच मोबाईलवर संदेशसही पाठवायचा. याबाबत मुलीने आई-वडिलांना याची माहिती दिली होती. त्यानुसार वडिलांनी दसर्‍याच्या दिवशी रोशन याच्या काकांना समज दिली होती. त्यावेळी रोशनने पुन्हा असे न करण्याची हमी दिली होती, अशी माहिती आहे.