Sat, Jul 20, 2019 23:27होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्हा बँकेची ९६ टक्के वसुली

रत्नागिरी जिल्हा बँकेची ९६ टक्के वसुली

Published On: Apr 09 2018 10:44PM | Last Updated: Apr 09 2018 9:24PMत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 96 टक्के वसुली करून विक्रम प्रस्थापित केला आहे. यावर्षी बँकेने 12 कोटी रूपये नफा मिळवला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा बँक नवनवीन तंत्रज्ञान वापरण्यावर भर देत असून लवकरच बँक मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर कंपनीचे सॉफ्टवेअरही बदलून सेवेत गतिमानता आणणार असल्याचे डॉ. चोरगे यांनी सांगितले.

बँकेने गुहागर येथील दिव्यांगांच्या संस्थेला 1 लाख रुपयांचा निधी देणगीस्वरूपात दिला आहे. त्याचबरोबर संस्थेतील दिव्यांगांनी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू केला तर त्यासाठी 9 टक्के व्याजदराने त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा स्वरूपाचे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी बँकेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत.

स्वप्नपूर्ती गृहकर्ज योजनेला गतवर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. 78 जणांनी सुमारे 9 कोटी 03 लाख कर्ज घेतले होते. यावर्षी या योजनेला मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
बँकेकडे सध्या 48.43 लाख एवढे भाग भांडवल आहे. 168.88 लाख एवढे गंगाजळी व इतर निधी आहे. 155.32 लाख एवढा स्वनिधी आहे. 115.86 लाख बाहेरील कर्ज आहेत. 1953.79 लाख एवढ्या ठेवी तर 1409.75 लाखांची कर्जे बँकेने दिली आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय 3363.55 लाख एवढा व्यवसाय आहे. बँकेने 727.14 लाख एवढ्या गुंतवणुका केल्या आहेत. तर बँकेचा नफा 12.02 लाख एवढा आहे. बँकेचे खेळते भांडवल 2277.37 लाख एवढे असून बँकेच्या 79 शाखा आहेत, अशी माहिती डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली.