Thu, Feb 21, 2019 09:11



होमपेज › Konkan › जिल्ह्यात हुडहुडी

जिल्ह्यात हुडहुडी

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 09 2018 11:28PM

बुकमार्क करा




रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात थंडीमध्ये वाढ झाल्याने नागरिक गारठून गेले आहेत. केवळ रात्रीच्या वेळीच नव्हे तर दिवसाही थंडी असल्याचे जाणवत आहे. दिवाळीच्या कालावधीत थंडी नव्हती. नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात झाली; मात्र या थंडीत सातत्य नव्हते. काही दिवस थंडी जाणवायची, तर काही दिवस थंडी नसल्याचे जाणवत होतेे. हवामान बदलातील या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सर्दी, थंडीताप, खोकला आदी आजार बहुतांशी लोकांना जडल्याची माहिती आहे.

एकीकडे उपचारासाठी दवाखान्यात तसेच स्वेटर, कानटोपी, जर्किन खरेदीसाठी बाजारात लोकांची गर्दी असल्याचे दिसून येत आहे. थंडीचा प्रभाव सायंकाळपासून जाणवण्यास सुरूवात होते. रात्रीच्या वेळी ती वाढत जाऊन पहाटेच्या वेळी कडाक्याची थंडी वाढत असल्याचा अनुभव सर्वांना येत आहे.