Wed, Jan 16, 2019 13:26होमपेज › Konkan › कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमस, हिवाळी सुट्टीसाठी विशेष गाड्या

कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमस, हिवाळी सुट्टीसाठी विशेष गाड्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : खास प्रतिनिधी

हिवाळी पर्यटन तसेच ख्रिसमसच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे गाड्यांना होत असेलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर दोन विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. डिसेंबरमध्ये दि. 18 डिसेंबरपासून या विशेष गाड्या धावणार आहेत.

जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांपैकी अजनी (नागपूर) -करमाळी मार्गावर दि. 18, 25 डिसेंबर तसेच दि. 1 जानेवारी 2018 रोजी विशेष गाडी (01119/01120)सोडण्यात येणार आहे.  अजनीहून ही गाडी सांय. 7.50 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्री 8.30 वा. ती गोव्यात करमाळीला पोहोचेल. करमाळीहून ही गाडी दि. 19, 26 डिसेंबर तसेच दि. 2 जानेवारी 2018 रोजी रात्री  9.30 वाजता नागपूरसाठी  सुटणार आहे. ही  गाडी दुसर्‍या रात्री 10 वा. अजनीला पोहोचल. या विशेष गाडीला वर्धा, पुळगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर,  भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, ईगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थीवी हे थांबे देण्यात आले आहेत.

दुसरी विशेष गाडी (01045/01046) ही लो. टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान धावणार आहे. ही गाडी दि. 22 व 29 डिसेंबर रोजी धावणार आहे. ही गाडी लो. टिळक टर्मिनसहून रात्री 1.10 वा. सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11 वा. ती करमाळीला पोहचेल. ही गाडी करमाळीहून त्याच दिवशी दुपारी 2 वा. सुटेल आणि मुंबईत लो. टिळक टर्मिनसला ती दुसर्‍या दिवशी 12.20 वा. पोहचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली तसेच थीवी स्थानकावर थांबणार आहे.