Thu, Jul 18, 2019 20:44होमपेज › Konkan › आंगणेवाडी यात्रेसाठी 25 पासून विशेष गाड्या

आंगणेवाडी यात्रेसाठी 25 पासून विशेष गाड्या

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 10:24PMरत्नागिरी : खास प्रतिनिधी

सिंधुदुर्गातील आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेमार्गावर दि. 25 जानेवारीपासून विशेष गाड्या धावणार आहेत. आंगणेवाडी यात्रेसाठी या आधीही काही विशेष फेर्‍या जाहीर केल्या आहेत. या गाड्यांमध्ये आणखी तीन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. नव्याने जाहीर केलेल्या विशेष गाड्यांमध्ये लो. टिळक टर्मिनस-सावंतवाडी, पुणे-सावंतवाडी तसेच मुंबई सीएसएमटी-मडगाव या गाड्यांचा समावेश आहे. यातील लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडीदरम्यान धावणारी गाडी (01337/38) दि. 26 जानेवारी रोजी रात्री 12.45 वा.  

मुंबईतून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ती 11.30 वा. ती सावंतवाडीला पोहोचेल. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी दुपारी 1 वा. 10 मिनिटांनी सुटेल आणि रात्री 12.20 वाजता लो. टिळक टर्मिनसला पोहोचेल.  या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग तसेच कुडाळ हे थांबे दिले आहेत. दुसरी विशेष गाडी (01163/64) ही दि. 25 जानेवारी रोजी पुणे ते सावंतवाडी मार्गावर धावणार आहे. ही गाडी पुण्याहून सायं. 6.45 वा. सुटेल आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 4 वा. सावंतवाडीला पोहोचेल. या गाडीचा परतीचा प्रवास दि.26 रोजी पहाटे 5 वा. सुरू होईल आणि पुण्याला ती सायंकाळी 5.20 वाजता पोहोचेल.