Mon, Apr 22, 2019 15:45होमपेज › Konkan › जिल्हा नगर वाचनालयाचा एक लाख पुस्तकांचा संकल्प

जिल्हा नगर वाचनालयाचा एक लाख पुस्तकांचा संकल्प

Published On: May 13 2018 10:22PM | Last Updated: May 13 2018 9:15PMरत्नागिरी : प्रतिनिधी

एक लाख पुस्तकांच्या संकल्पासाठी गेल्या आठ दिवसात रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात वाचक, संस्थांकडून एक हजार पुस्तके जमा झाली आहेत. त्यामुळे पुस्तकांची संख्या 95 हजार झाली असून आणखी पाच हजार पुस्तकांची गरज आहे. येत्या 100 दिवसांत ही पुस्तके सुद्धा जमा होतील, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

1828 मध्ये स्थापन झालेले हे वाचनालय अद्ययावत, संगणकीकृत आहे. लाख पुस्तकांच्या संकल्पाचे आवाहन कळल्यानंतर दररोज वाचक नवनवीन व घरातील अनेक पुस्तके जमा करत आहेत.
चित्पावन ब्राह्मण संघाने चित्पावन कोष, स्वामी, अग्निपंख आदी पुस्तके दिली आहेत. विविध संस्था, व्यक्तींकडून पुस्तके मिळत आहेत. पत्रकार अनिल जोशी यांनी 100 पुस्तके देण्याचे मान्य केले आहे.

तसेच जिल्हा बँक कर्मचारी, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे कर्मचारी, अभिनेता दीपक करंजीकर, प्रशांत दीक्षित आदींकडून लवकरच पुस्तके मिळणार असल्याचे सांगण्यात आले. साधारण 30 जूनपर्यंत पुस्तके जमा करण्याचे आवाहन केले आहे. काही पुस्तके वाचनालय खरेदी करणार आहे. महाराष्ट्रातील विविध संस्थांशी संपर्क साधला असून त्यांच्यामार्फत पुस्तके मिळतील. लाखाचा संकल्प नक्की पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले.