होमपेज › Konkan › रेशन दुकानांमध्ये 31 पर्यंत पॉस सक्रिय

रेशन दुकानांमध्ये 31 पर्यंत पॉस सक्रिय

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी  ; प्रतिनिधी

रेशन दुकानांची डिजिटायझेशन प्रक्रिया वेगाने सुरू करण्यासाठी रेशन दुकानावरून पॉसद्वारे (पॉईंट ऑफ सेल) कॅशलेस व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 917 दुकानांना पॉस मशीनचे वितरण करण्यात आले आहे. 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये पॉस सक्रिय करण्याचे उद्दिष्ट जिल्हा पुरवठा विभागाने ठेवले आहे.  शासनाने चलन निश्‍चलीकरण केल्यानंतर कॅशलेस सोसायटी निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात रेशन दुकाने चलनमुक्‍त करण्यासाठी उद्देश ठेवला होता. यामध्ये दुकानांचे डिजिटायझेशन करण्यात येणार होते. त्यासाठी पॉस मशीनचे वितरण करून दुकानावरील व्यवहार कॅशलेस करण्यात येणार होते. सहा महिन्यांहून अधिक काळ या प्रक्रियेत गेल्यानंतर अखेर पॉस मशीनचे वाटप करण्यात आले. 

त्याआधी दुकानदारांना प्रशिक्षित करून प्रात्यक्षिकाद्वारे जिल्ह्यातील 917  दुकानांचा डिजिटायझेशनचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. आता या दुकानावरून धान्य वितरणाबरोबर अन्य 25 प्रकारची कामे सेवासुविधा म्हणून देण्यात येणार आहेत. यामध्ये बँकिंग व्यवहार, विमा हप्‍ता भरणा, मोबाईल बिल यासह अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. महिनाभरात उर्वरित दुकानांमध्ये पॉस सक्रिय करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागातर्फे देण्यात आली.
 


  •