Wed, Mar 27, 2019 03:58होमपेज › Konkan › रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर ‘ओखी’ शमले

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर ‘ओखी’ शमले

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:32PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण किनारपट्टीवर घोंघावणार्‍या ‘ओखी’ चक्रीवादळाचा धोका तूर्त टळला असला तरी किनारपट्टी भागातील सतर्कता  मात्र अद्याप कायम आहे. मात्र, ‘ओखी’ च्या तडाख्याची मोजदाद सुरू झाली असून किनारी भागात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. वादळाच्या तीन दिवसीय प्रभावात अवकाळी पाऊसही झाल्याने आंबा कलमांसह मच्छीमारीवर झालेल्या परिणामांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना कृषी आणि मत्स्य विभागाला दिल्या आहेत.