Tue, Jul 23, 2019 18:49होमपेज › Konkan › कोकणात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आवश्यक 

कोकणात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आवश्यक 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : शहर वार्ताहर

 नैसर्गिक सौंदर्य, तसेच मुबलक प्रमाणात मिळणारे कृषी उत्पादन हे कोकणचे वैभव असून, कोकणमधील तयार होणार्‍या सर्व वस्तू, तसेच कृषी उत्पादनास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाल्यास खर्‍या अर्थाने कोकण समृद्धीकडे वराटचाल करेल, असा विश्‍वास केंद्रीय वाणिज्य, उद्योग व नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्‍त केला. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये उच्चस्तरीय अधिकार्‍यांची राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ना. प्रभू बोलत होते. यावेळी केंद्रीय उद्योग विभागाचे सहसचिव अनिल अग्रवाल, केंद्रीय वाणिज्य विभागाचे सहसचिव एस. के. सरंगी, विशेष

आर्थिक क्षेत्राचे अध्यक्ष टी.व्ही. रवी, केंद्रीय उद्योग संचालक राजीव अग्रवाल, केंद्रीय सहसचिव सुधांशू पांडे, अपेडाचे अध्यक्ष डी.के. सिंग, फूड प्रोसेसिंगचे संचालक जितेंद्रकुमार, जिल्हाधिकारी प्रदीप पी., सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, तसचे केंद्रीय व राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोकणात पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष वाव असून, किल्ले पर्यटन, समुद्र पर्यटन, कृषी पर्यटन, हवाई पर्यटन अशा विविध पर्यटन क्षेत्रातील बाबी विकसित करून पर्यटक कसे वाढतील याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे ना. प्रभू म्हणाले. कोकणातील दळणवळणाचे महत्त्वाचे साधन असलेली हवाई सेवा कोकणवासीयांच्या सेवेत लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेवेमुळे कोकणातील उत्पादन थेट विदेशात निर्यात करता येणार आहे. यामुळे रोजगाराच्या विविध संधी कोकणामध्येच उपलब्ध होणार असल्याचे ना. प्रभू यांनी यावेळी सांगितले.
 

 

 

tags ; Ratnagiri,news,In Konkan, International, market, available,


  •