होमपेज › Konkan › रत्नागिरी जि.प.चे सुधारित अंदाजत्रक 26 कोटींचे

रत्नागिरी जि.प.चे सुधारित अंदाजत्रक 26 कोटींचे

Published On: Jan 03 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 8:51PM

बुकमार्क करा
रत्नागिरी ः प्रतिनिधी

2016-17 या आर्थिक वर्षामध्ये 20 टक्के समाजकल्याण व 10 टक्के महिला बालकल्याण विभागाकडील योजनांवर कमी खर्च झाल्याने निधी शिल्लक राहिला आहे. योजनांवरचा खर्च विहित मुदतीत व्हावा तसेच दिव्यांगांना योजनांचा लाभ मिळावा व 100 टक्के निधी खर्च व्हावा, या हेतूने मंगळवारी आयोजित जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत 26 कोटी 57 लाख 55 हजार 830 रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. वित्त व शिक्षण सभापती दीपक नागले यांनी हे अंदाजत्रक सादर केले. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. बामणे, जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहा सावंत, समाजकल्याण सभापती चारुता कामतेकर, महिला व बालकल्याण सभापती ॠतुजा खांडेकर, गटनेते उदय बने, विरोधी गटनेते विक्रांत जाधव, रचना महाडिक आदी उपस्थित होते. 

मूळ अंदाजपत्रकामध्ये दि. 1 एप्रिल 2017 रोजीची आरंभीची शिल्लक रक्कम रुपये 63,630 एवढी दाखवण्यात आली असली तरी सन 2016-17 या आर्थिक वर्षातील प्रत्यक्ष जमा व प्रत्यक्ष खर्च याचा विचार करता प्रत्यक्षात ही रक्कम रुपये 5 कोटी 11 लाख 46 हजार 752 रुपये एवढी राहिली आहे. सन 2017-18ची सुधारित महसुली जमा रक्कम रुपये 16 कोटी 30 लाख 7 हजार 748 एवढी विचारात घेऊन रक्कम रुपये 21 कोटी 41 लाख 54 हजार 500 जमा होणार आहे. मूळ अंदाजपत्रक 20 कोटी 80 लाख 17 हजार 30 रुपयांचे आहे. सुधारित खर्चाच्या अंदाज पत्रकात जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या महसुली उत्पन्नावर करावयाच्या खर्चात 5 कोटी 76 लाख 82 हजार 800 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. भांडवली खर्चातही 80 हजारांची वाढ करण्यात आली  आहे.