Mon, Mar 18, 2019 19:20होमपेज › Konkan › अल्पवयीन युवतीवर बलात्कार

अल्पवयीन युवतीवर बलात्कार

Published On: Dec 16 2017 1:42AM | Last Updated: Dec 16 2017 1:42AM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

अल्पवयीन युवतीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन एका विवाहित तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित  केले. यातून ही मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिली आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणारा कायदा (पोक्सो)अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार देवदत्त दिलीप पाटील (29, सध्या रा. शांतीनगर रसाळवाडी मूळ रा. गुहागर पालशेत) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार देवदत्त पाटील आणि  पीडित मुलीची तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. यातूनच 22 ऑगस्ट रोजी या मुलीची आई सोमेश्‍वर येथे रेशन आणण्यासाठी गेली असता तिच्या एकटेपणाचा फायदा उठवत देवदत्तने तिच्याशी शारीरिक संबंध  ठेवले. त्यानंतर 28 सप्टेंबर 2017 रोजीही त्यांच्यात संबंध आले होते.

यातून ही पीडित मुलगी  दोन महिन्यांची गरोदर राहिली. ही बाब तिच्या आईला समजताच तिने मुलीकडे चौकशी केल्यावर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. देवदत्त पाटील हा विवाहित असून त्याला एक मुलगीही आहे. या प्रकरणी 14 डिसेंबर रोजी शहर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यानुसार शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाटील याच्यावर भा. दं. वि. क. 376 नुसार गुन्हा दाखल झाला असून अटक केली. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे करत आहेत.