Wed, Feb 20, 2019 12:58होमपेज › Konkan › जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

Published On: Jun 16 2018 10:46PM | Last Updated: Jun 16 2018 10:34PMसावंतवाडी/वैभववाडी : प्रतिनिधी 

येथील ईद उल फित्र म्हणजेच मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमजान सणानिमित्त येथील जामा मस्जिदमध्ये पहिले नमाज पठण झाले. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या पवित्र सणाला सर्व मुस्लिम बांधवांना नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बिद्रे, गजानन नाटेकर, सचिन इंगळे, घाग बंधू अशीर्वाद आदी उपस्थित होते. अ‍ॅड. सुहेब डिंगणकर, समीर बेग, शहरप्रमुख शब्बीर मणियार, मुलानी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, तरुणांना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. जुम्मा मस्जिद व उभाबाजार येथील मस्जिदमध्ये ही नमाज पठण झाले.

नांदगावात ईद साजरी

नांदगाव येथेही रमजान ईद मोठया उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी नांदगाव येथील मदिना मस्जिद व गौसीया मस्जिद या ठिकाणी मुस्लिम बांधव एकत्र येत नमाज पठण केले.एकमेकांना  गळाभेट करत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी या सणाची ओळख आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. यामुळे शनिवारी रमजानच्या दिवशी मुस्लीम बांधव आनंदित झाले होते. तर फितर म्हणजे दान करणे.अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येत असल्याने या सणाचा आनंद मुस्लिम बांधवांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता.अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देत होते.