होमपेज › Konkan › राजापूर नगराध्यक्ष हनिफ काझी यांचा राजीनामा

राजापूर नगराध्यक्ष हनिफ काझी यांचा राजीनामा

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 10:21PMराजापूर : प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने अपील फेटाळताना केलेल्या आदेशात दोन आठवड्यांच्या कालावधी दिलेला असताना व तो संपण्यासाठी जेमतेम दोन दिवस असतानाच सोमवारी येथील लोकनियुक्‍त नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी सोमवारी नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला आहे.

दरम्यान, काझी यांचा हा राजीनामा तत्काळ मंजूर झाल्याने नगराध्यक्षपदाचा पदभार उपनगराध्यक्ष जमीर खलिफे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्‍त नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे हनिफ काझी यांनी आरक्षित असलेल्या इतर मागास प्रवर्गातून निवडणूक लढवून निवडून आले होते.