होमपेज › Konkan › ‘रिफायनरी’मुळे कोकणचा कायापालट होईल

‘रिफायनरी’मुळे कोकणचा कायापालट होईल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

नाणार येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत गैरसमज पसरविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात प्रदूषणाबाबत कोणताच धोका या प्रकल्पापासून नसून भविष्यात या प्रकल्पामुळे रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. शिवाय कोकणचा कायापालट होईल, असा विश्वास  रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅन्ड पेट्रोकेमिकल कंपनीचे प्रवक्ते अनिल नागवेकर यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

राजापूर तालुक्यातील नाणार येथे जगातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्प मार्गी लागत असून सदर प्रकल्पातून पर्यावरणाला धोका निर्माण होईल, या कारणावरुन जोरदार विरोध सुरु असतानाच प्रत्यक्षात हा प्रकल्प कसा आहे, यापासून प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेत निर्माण झालेल्या शंका कुशंका याबाबत सत्यस्थिती स्थानिक जनतेला देण्यासाठी रत्नागिरीरिफायनरी अ‍ॅन्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड यांच्यावतीने राजापुरात आयोजीत पत्रकार परिषदेत प्रकल्पाविरोधातील सर्व मुद्दे खोडुन काढण्यात आले. या पत्रकार परिषदेला कंपनीचे प्रवक्ते अनिल नागवेकर व जनसंपर्क अधिकारी अजित मोर्य उपस्थित होते .
रिफायनरी प्रकल्पाबाबत मोठ्या प्रमाणावर गैरसमज जनतेत पसरवून देण्यात आले आहेत.

आपल्या देशात एकूण 23 ठिकाणी रिफायनरी प्रकल्प कार्यांन्वित असून नाणारमधील तो चोवीसावा आहे. देशातील सर्वांत मोठा रिफायनरी प्रकल्प गुजरातमधील जामनगर येथे असून तेथे कुठल्याच प्रकारचे प्रदूषण झालेले नाही, अशी माहिती अनिल नागवेकर यांनी दिली. याबाबत कुणाला जाणुन घ्यावयाचे असल्यास जामनगरसह देशातील कुठल्याही रिफायनरीला आपण भेट देऊन पहाणी करु शकता, असे त्यांनी  सांगितले. रिफायनरीबाबत चुकीची वृत्ते स्थानिकांनहा देण्यात आली व गैरसमज पसरविण्यात आले. पण सत्य काय आहे, हेे जनतेपुढे आले नाही. ते  जनतेसमोर आणण्याचे काम कंपनी करीत असल्याचे नागवेकर यांनी स्पष्ट केले. 

या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला विश्वासात घेवुनच प्रकल्प मार्गी लावू, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार आम्ही प्रकल्प परीसरातील जनतेसमवेत जावून प्रकल्पाबाबत चर्चा करुन वस्तुस्थिती कशी आहे ते पटवुन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रवक्‍ते नागवेकर यांनी विस्तृत स्वरुपात माहिती  दिली. विविध ठिकाणच्या रिफायनरी प्रकल्पांमध्ये सुमारे दीड लाखाच्या आसपास कर्मचारी आहेत. मात्र, त्यांच्यापैकी कुणाला कसलीही व्याधी या प्रकल्पामुळे झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट करताना जनतेनेदेखील चुकीच्या माहितीकडे लक्ष देवू नये, असे आवाहन केले .
 


  •