होमपेज › Konkan › रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुखांना जाब विचारा : राज ठाकरे

रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुखांना जाब विचारा : राज ठाकरे

Published On: May 24 2018 10:30PM | Last Updated: May 24 2018 10:09PMराजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी  प्रकल्प होऊ देणार नाही, नाणारचा विषय आता संपला आहे, अशी भूमिका मांडणारी शिवसेना आजही सत्तेत असताना शासन हा प्रकल्प कसा काय रेटवण्याचा प्रयत्न करीत आहे? याबाबतचा जाब शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसह त्यांच्या लोकप्रतिनिधींनाच विचारा, अशी रोखठोक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  मांडली. आपण नाणारवासीयांच्या सोबत राहून या प्रकल्पाबाबत पुढे काय करायचे त्याचा निर्णय  घेऊ,  अशी ग्वाही त्यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संघटनात्मक पातळीवरील राज्यव्यापी दौरा सुरू असून गुरुवारी ते राजापुरात आले होते. महामार्गावरील गुरुमाउली येथील हॉटेलवर त्यांनी नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केले. सेनेच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी बोट ठेवले. नाणारवासीयांच्या शिवसेनेकडून 
अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण न झाल्याने मनसे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार का? असे विचारले असता, आम्ही नाणारवासीयांच्या समवेत आहोत, आता पुढे कसे करायचे ते आमच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन ठरवू, अशी भूमिका त्यांनी मांडली.