Wed, May 22, 2019 14:20होमपेज › Konkan › आगामी दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार

आगामी दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 9:05PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाने ऑगस्ट महिन्यात सातत्य ठेवले असून आतापर्यंत 2900 मि. मी. सरासरी पाऊस झाला आहे. आगामी काळात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. दक्षिण कोकणसह गोव्यात  22 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तविली आहे. जोरदार वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने किनारी भागात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केल्या आहेत.

जिल्ह्यात पावसाने  सरींचा राबता सुरूच ठेवला आहे. आगामी काळात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानुसार ‘आयएमडी’ने 22 ऑगस्टपर्यंत कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पावसाने गतवर्षाच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. चारशे मि.मी सरासरी जादा पाऊस पडला आहे. यावर्षी  कोकणात  एक हजार मि. मी. जादा पाऊस पडण्याची शक्यता असून जिल्ह्यात पडणार्‍या सरासरी पावसाच्या तुलनेत पाऊस केवळ 500 मि. मी. ने दूर आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाची वाटचाल याच पद्धतीने राहिल्यास पावसाची सरासरी याच महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.