Thu, Feb 21, 2019 07:03होमपेज › Konkan › रानकुत्र्यांच्या हल्ल्यात १४ शेळ्या ठार

रानकुत्र्यांच्या हल्ल्यात १४ शेळ्या ठार

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 10:20PM

बुकमार्क करा
कसाल :वार्ताहर 

पोखरण- धनगरवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील लक्ष्मण  जानू गावडे यांच्या शेळ्यांच्या कळपावर तांबळाचा माळ परिसरात रानकुत्र्यांनी हल्ला करत 14 शेळ्या ठार केल्या.  यामुळे गावडे यांचे सुमारे 76 हजारांचे नुकसान झाले आहे. या अनपेक्षित प्रकाराने गावडे व परिसरातील शेतकरी हादरून गेले आहेत. वनविभागाने यापोटी भरपाई द्यावी, अशी मागणी गावडे यांनी केली आहे. तब्बल 15 दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

लक्ष्मण गावडे हे 23 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले होते. सायंकाळी शेळ्यांचा कळप घेऊन घरी परतत असताना वाटेत  रानकुत्र्यांच्या टोळीने शेळ्यांच्या कळपावर अचानक हल्ला केला.  सुमारे 15 ते 16 रानकुत्र्यांनी एकाचवेळी कळपावर हल्ला करत 14 शेळ्या ठार मारल्या. गावडे यांनी आराडाओरड करत या कुत्र्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला असता काही कुत्र्यांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिन्हीसांजेची वेळ व निर्मनुष्य परिसर यामुळे गावडे हतबल ठरले. रानकुत्र्यांनी काही शेळ्यांचे मृतदेह जंगलात लांबविले.