Wed, Mar 27, 2019 03:55होमपेज › Konkan › ‘रिपाइं’च्या संपर्कप्रमुखाला गुंगीचे औषध देऊन लुटले

‘रिपाइं’च्या संपर्कप्रमुखाला गुंगीचे औषध देऊन लुटले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खेड : प्रतिनिधी 

‘रिपाइं’ पक्षाचे कोकण युवक आघाडीचे संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व साहित्याची लूट केली. हा प्रकार रविवारी रात्री उशिराने उघडकीस आला. दि. 31 मार्च रोजी खेड येथे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चासाठी सकपाळ मुंबई येथून खेड येथे आले होते. मोर्चा आटोपून ते आपले सहकारी विकास धोत्रे यांच्यासह भरणे नाका येेथे मुंबईकडे जाण्यासाठी बसची वाट पहात उभे होते. त्याचवेळी गोव्याहून मुंबईकडे प्रवासी घेऊन जाणारी कार येऊन थांबली. चालकाने मुंबईकडे जाण्याची विचारणा केली. त्यानंतर सकपाळ हे गाडीत बसले. कार पोलादपूर नजीकच्या एका ढाब्यानजीक आल्यानंतर कारमधील चालकासह अन्य तिघांनी सकपाळ यांना चहा तसेच शीतपेय घेण्याची विनंती केली. मात्र, सकपाळ यांनी ते घेण्यास नकार दिला.

त्यानंतर कारमधील चौघांनी बळजबरीने सकपाळ यांना पाणी पाजले. त्यानंतर सकपाळ यांना मारहाण करत त्यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट, दोन अंगठ्या, मोबाईल फोन, खिशातील पाकीट आणि बॅग हिसकावून घेतली. त्यांच्या पायात असणारे बूटही काढून घेतले. त्यांना त्या ढाब्यानजीक सोडून चौघांनी पलायन केले. 

Tags : Konkan, Konkan News, RPI, contact head, robbed, nasty drug


  •