Mon, Apr 22, 2019 12:14होमपेज › Konkan › ‘आरजीपीपीएल’ची 33 कोटींची थकबाकी

‘आरजीपीपीएल’ची 33 कोटींची थकबाकी

Published On: Feb 26 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 9:03PMगिमवी : वार्ताहर

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्रोजेक्टला महावितरणने विद्युत पुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावली आहे. आरजीपीपीएल कंपनीने तब्बल 32 कोटी 60 लाख रुपये थकविल्याने ही कारवाईची नोटीस बजावली आहे. त्यामुळे कंपनीवर नामुष्की ओढवली आहे.

‘आरजीपीपीएल’ ही कंपनी भारत सरकारची आहे. कंपनीने एप्रिल 2014 पासून महावितरणचे बिल थकविले असून जवळपास चार वर्षांची ही थकबाकी आहे. थकीत वीज बिल भरण्यासाठी कंपनीला 15  दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत ही रक्‍कम न भरल्यास प्रकल्प बंद होण्याची नामुष्की ओढवणार आहे. शिवाय, कंपनीचा पाणीपुरवठाही ठप्प होणार आहे. 

महावितरणने करारानुसार दोन वीजजोडण्या दिल्या होत्या. 2007 ते 2014 असा करार आरजीपीपीएलने महावितरणशी केला होता. हा करार पोफळी महाजनकोशी केला असला तरी या वीजजोडण्या शिरळ पंप हाऊस येथे केल्या आहेत. त्यामुळे महावितरणच्या उपअभियंत्यांनी कंपनीला वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावली आहे.