Tue, May 21, 2019 22:09होमपेज › Konkan › शासनाची टीम महामार्ग चौपदरीकरणग्रस्तांच्या दारी!

शासनाची टीम महामार्ग चौपदरीकरणग्रस्तांच्या दारी!

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 03 2018 10:12PMकुडाळ ः वार्ताहर

महामार्ग चौपदीकरण अंतर्गत येणारी बांधकामे तसेच भुधारकांमध्ये महामार्ग प्राधिकरण तर्फे नुकतीच जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वागदे ते झाराप या 44 किं.मीच्या टप्प्यातील सर्व भूधारकांच्या दारात ही जनजागृती मोहीम राबविणध्यात आली. या परिसरात अद्याप काम सुरू न झालेली अशी सुमारे 160 बांधकामे असून या भागातील कामे मार्गी लावण्यासाठी पोलिस यंत्रणेलाही सोबत घेतले असून महामार्गाच्या उर्वरित कामाला चतुर्थीनंतर गती देण्यासंदर्भात संबंधित विभागाने उचललेली ही  पावले असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

गेले दोन दिवस कुडाळ-सांर्गिर्डे परिसरात अशा प्रकारची मोहीम राबविण्यात आली. अशी मोहीम  सद्यस्थितीत वागदे ते झाराप परिसरात राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा पोलिसांमार्फत एक पोलिस अधिकारी, दहा कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी ,नायब तहयीलदार, भूमीअभिलेखचे भूमापन कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, प्रांताधिकारी कार्यालयाचे कर्मचारी असे पथक तयार करण्यात आले असून या बांधकाम धारकांच्या दारापर्यंत ही यंत्रणा थेट पोहचत आहे. या भागात महामार्ग प्रशासनाला तीन टप्प्यात जमिनीचा ताबा देण्यात आला.ज्यांना पैसे मिळाले आहेत असे भुधारक, ज्याचा विषय कोर्टात गेला आहे असे  अशा स्वरूपाच्या टप्प्यात महामार्ग प्रशासनाला बर्‍याच भूधारकांचा ताबा महामार्ग प्रशासनाला मिळाला आहे. त्यामुळे आता या ताबा मिळालेल्या भूधारकांमध्ये जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेवून काम सुरू करण्यासंदर्भात जागृती करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अशा भूधारकांबाबत कोणतीही कडक कारवाई न करता त्यांचे याबाबत सामजस्याचे प्रबोधन करून त्यांच्या समस्याही या दरम्यान मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

महामार्ग प्रशासनामार्फत यासाठी चतुर्थी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. चतुर्थीनंतर  प्रशासन उर्वरीत जमिनीवर प्रत्यक्षात कामाला सुरवात करण्याच्या दृष्टीने ही मोहीम असल्याचे महामार्ग प्रशासनाकडून अभियंता श्री. शेडेकर यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित भुधारक व बांधकाम धारकांना आपले विषय मार्गी लावण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे जावू लागू नये यासाठी संबंधित सर्व  यंत्रणाच घेवून बांधकाम धारक व  भूधारकांच्या दारापर्यंत आपण जात असल्याचे श्री.शेडेकर यांनी सांगितले आहे.