होमपेज › Konkan › सार्वजनिक बांधकाममधील अभियंत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सार्वजनिक बांधकाममधील अभियंत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Published On: Jun 01 2018 11:01PM | Last Updated: Jun 01 2018 10:43PMचिपळूण : वार्ताहर

सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सेवेत असणार्‍या एका कर्मचार्‍याने शासनाची दीड लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सचिन लक्ष्मण पेढांबकर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता शरद सीताराम धामापूरकर यांनी चिपळूण पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सचिन पेढांबकर यांनी 1 जून 2008 ते 3 एप्रिल 2018 या कालावधीत शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी 1 लाख 59 हजार 210 रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन पेढांबकर यांनी स्थापत्य अभियांत्रिकी पदविका नोंदणी करून या कालावधीत विविध कंपन्या व संस्थांमध्ये शासकीय सेवेत असताना बेकायदेशीरपणे नोकरी केली. 

शासकीय सेवेत असतानाही त्यांनी 16 लाख 92 हजार 105 रुपये किमतीच्या कामांपोटी दहा टक्के लाभ मिळविला. यामुळे शासनाची दीड लाखांची फसवणूक झाली आहे, असा ठपका ठेवून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक वांगणेकर करीत आहेत.