Sun, Aug 25, 2019 07:58होमपेज › Konkan › रत्नागिरीत कोळंबी बीज उत्पादन केंद्र!

रत्नागिरीत कोळंबी बीज उत्पादन केंद्र!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

कोळंबी उत्पादनात वाढ करण्यासाठी कोळंबी बीज उत्पादन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामध्ये ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

राज्यात सध्या तामिळनाडू व आंध्र प्रदेशातून कोळंबीची बीज आयात केले जाते. मात्र, त्याची आयात करणे हे परवडणारे नसल्याने तसेच परकीय चलन मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यता असल्याने त्याची उत्पादन केंद्रे राज्यातच सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहे. 

केंद्राच्या नीलक्रांती योजनेच्या धर्तीवर ही केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बीज उत्पादन करणार्‍या दोन तर कमी प्रमाणावर बीज उत्पादन करणार्‍या 5 मिनी कोळंबी बीज उत्पादन केंद्रांचा समावेश आहे.

ठाणे-पालघर व रायगड जिल्ह्यासाठी एक व रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक अशी दोन मोठी तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांसाठी कमी क्षमतेची प्रत्येकी एक याप्रमाणे पाच केंद्रे सुरू केली जाणार आहेत. 

Tags : Ratnagiri, Prunj Seed Production, Center,


  •