Thu, Jun 20, 2019 00:33होमपेज › Konkan › प्रस्तावित मालवण मत्स्यालयासाठी ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित!

प्रस्तावित मालवण मत्स्यालयासाठी ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित!

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 9:09PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी 

मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाच्या धर्तीवर मालवण शहरात साकारणार्‍या मत्स्यालय प्रकल्पाचे सादरीकरण डॉ. सारंग कुलकर्णी यांनी गुरूवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केले. 25 ते 30 कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी एक एकर जागेची आवश्यकता असल्याचे डॉ.कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. 

सारंग  कुलकर्णी म्हणाले, मालवणात पर्यटक  मोठ्या संख्येने येतात, परंतु यातील बहुतांश पर्यटक तारकर्ली, देवबाग ही ठिकाणे पाहण्यासाठी येतात. मालवण शहरात जास्तीत जास्त दिवस पर्यटक रहावा, यासाठी  नगरपालिकेच्या शताब्दी वर्षानिमित्त मत्स्यालय प्रकल्पाची संकल्पना पुढे आली. मालवणातील मत्स्यालयाचा प्रकल्पासाठी एक एकर जागेची आवश्यकता आहे.या प्रकल्पासाठी अंदाजित 25 ते 30 कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. तीन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, असे कुलकर्णी म्हणाले.  

मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयात ठराविक पद्धतीचे मासे आहे. मालवणातील प्रस्तावित मत्स्यालय प्रकल्पात विविध प्रजातीच्या माशांचा समावेश असणार आहे. एक एकरच्या या प्रकल्पात जंगल, धवबबा, मासे, खारफुटीची मुळे त्याचबरोबरीने लहान मुलांसाठी टच पूल, सेल्फी पाईंट, फाय डी थीएटर्स, रेस्टारंट यांचा समावेश असणार आहे. प्रकल्पासंदर्भात बोलताना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक नितीन वाळके, मंदार केणी, आप्पा लुडबे, गणेश कुशे यांनी मत्स्यालयासाठी आवश्यक एक एकर जागेची निश्चिती लवकरात लवकर करावी अशी सूचना  केली. गणेश कुशे यांनी मत्स्यालय प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल लवकरात लवकर तयार कारावा, जेणे करून प्रकल्पाचा प्रस्तावा शासनाकडे सादर करता येईल, अशी सूचना मांडली. 

पालिकेच्या शताब्दी वर्षात पर्यटकांना भेट

डॉ. सारंग कुलकर्णी म्हणाले, सी वर्ल्ड हा प्रकल्प अवाढव्य स्वरूपाचा होता. परंतु मत्स्यालयाचा हा प्रकल्प त्या तुलनेत छोट्या जागेत होणार आहे. तसेच प्रकल्पाचे बजेटही कमी आहे. त्यामुळे मालवण नगगरपालिकेच्या शताब्दी वर्षानिमित्त हा प्रकल्प पर्यटकांसाठी एक भेट ठरेल.