Mon, Apr 22, 2019 23:47होमपेज › Konkan › रत्नागिरीचा प्रेम साळवी रणजीच्या सराव शिबिरात

रत्नागिरीचा प्रेम साळवी रणजीच्या सराव शिबिरात

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 9:17PMरत्नागिरी : क्रीडा प्रतिनिधी

सन 2018 च्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएनच्या निमंत्रित स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघातून या मोसमात सर्वाधिक धावा करणारा आक्रमक खेळाडू प्रेम साळवी याची सन 2018-2019 च्या संभाव्य रणजी संघाच्या सराव शिबिरासाठी निवड झाली आहे.

हे सराव शिबिर दि. 4 ऑगस्टपासून एक महिना पुणे येथे होणार आहे. याआधी प्रेमने निमंत्रित स्पर्धेमध्ये व विभागीय स्पर्धेमध्ये शतक झळकावत आपला ठसा उमटवला होता. त्याच्या या कामगिरीची दखल घेत  संभाव्य रणजी स्पर्धेसाठी यांची निवड करण्यात आली आहे. प्रेम जिल्हास्तरीय टी-20 स्पर्धेत सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. तो फलंदाजीबरोबर फिरकी गोलंदाजीही करतो. 

या यशाबद्दल त्याचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य किरण सामंत, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोशिएनचे अध्यक्ष आ. उदय सामंत, सचिव सुरेश जैन खजिनदार, प्रशिक्षक हरीष लाडे, माजी सचिव दीपक मोरे व सर्व पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.