Mon, Mar 25, 2019 09:10होमपेज › Konkan › पोलिस पथकाने जप्त केली दीड लाखाची गोवा दारू

पोलिस पथकाने जप्त केली दीड लाखाची गोवा दारू

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:40PMकणकवली : प्रतिनिधी

जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम आणि अप्पर पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचला. वाहनांची तपासणी करताना सकाळी 7.30 च्या सुमारास नांदगाव तिठा पुलाजवळ गोव्याहून मुंबईच्या दिशेने एका कारमधून वाहतूक होत असलेली 1 लाख 57 हजार 920 रु. ची गोवा बनावट दारू जप्त केली. 

या प्रकरणी कारचालक जीवन सुरेश वाडकर (वय 24, रा. कुडाळ, नाबरवाडी) आणि प्रवीण शंकर कोचरेकर (45, रा. चेंदवण) यांना अटक केली. तसेच पाच लाखांची कारही जप्त करण्यात आली. बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.