Wed, Mar 20, 2019 23:31होमपेज › Konkan › ओखी वादळात सापडलेल्या पोलिस गस्ती नौका सुखरूप

ओखी वादळात सापडलेल्या पोलिस गस्ती नौका सुखरूप

Published On: Dec 11 2017 1:31AM | Last Updated: Dec 10 2017 9:00PM

बुकमार्क करा

वेंगुर्ले : शहर वार्ताहर 

समुद्रात अचानक निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळामुळे वेंगुर्ले बंदरात असलेल्या पोलिसांच्या सागरकन्या व अस्मिता या दोन्ही स्पीडबोटी रेडी पोर्ट येथे सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्या होत्या. मात्र, सागरी पोलिस सुरक्षा विभागाच्या सांघिक कामगिरीमुळे त्या दोन्ही स्पीडबोटी रेडी पोर्ट वरून वेंगुर्ले मांडवी बंदर येथे सुखरूपपणे आणण्यात आल्या अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रकाश सारंग व पोलिस उपनिरीक्षक एस. एस. धुरत यांनी दिली.

या सांघिक कामगिरीत त्यांच्यासोबत पी.सी.डी.एस. कोयंडे व बी. एस. चंदनशिवे तसेच कंत्राटी कामगार एस. वाय तारी,एस. ए. ताम्हणकर, एस. बी. रेडकर, वाय.व्ही.रेवंडकर, डी.जी दद्दीकर (इंजिन चालक), ए.ए.सोलकर ( इंजिन चालक) तसेच रेडी येथील पोर्ट अधिकारी श्री. पाटील, संदीप चव्हाण, रेडी सरपंच सौ. सुरेखा कांबळी यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच रेडीतील स्थानिकांचे योगदान लाभले.                

यापूर्वी झालेल्या फियान चक्रीवादळामध्ये सावित्री नौका व गेल्यावर्षी निवती रॉक येथे सिंधु-3 ही बोट जलसमाधी घेत असताना ती सुरक्षितरित्या बाहेर काढताना पोलिस उपनिरीक्षक प्रकाश सारंग व एस. वाय. तारी यांचा मोलाचा वाटा होता. नागरिकांमधून या कामगिरीची दाखल घेऊन या सर्वांचा सन्मान व्हावा, अशी आशा व्यक्‍त केली जात आहे.