Thu, Feb 21, 2019 00:57होमपेज › Konkan › परशुराम विकासासाठी पन्नास लाख मंजूर करू : रवींद्र वायकर 

परशुराम विकासासाठी पन्नास लाख मंजूर करू : रवींद्र वायकर 

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 8:56PMचिपळूण : खास प्रतिनिधी

श्री क्षेत्र परशुरामच्या विकासासाठी आणखी पन्नास लाख रुपयांचा निधी देवू, असे आश्‍वासन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले. त्यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी उशिरा विविध इमारतींचे उद्घाटन झाले. 

ना. वायकर यांच्या हस्ते प्रशासकीय इमारत, वाचनालय, दवाखाना, गोशाळा, सांस्कृतिक भवन, कर्मचारी वसाहत आदी इमारतींचे उद्घाटन झाले. यावेळी खा. विनायक राऊत, आ.  सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन कदम, हिराभाई बुटाला आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना.  वायकर म्हणाले, पर्यटन विकास योजनेतून आपण परशुरामाला निधी देत आहोत. या पुढच्या काळातदेखील आणखी मदत देण्यात येईल. पन्नास लाख निधीला आपण तत्काळ मंजुरी देत आहोत. तसेच दुसर्‍या टप्प्यातील निधी देण्यासाठी पाठपुरावा करू, असे सांगितले. खा. विनायक राऊत म्हणाले, या देवस्थानासाठी आपण सहकार्य करू. आ. सदानंद चव्हाण म्हणाले, या कामासाठी स्व. नाना जोशी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी यासाठी पाठपुरावा केला. या पुढच्या काळात आपले सहकार्य राहील असे सांगितले. सूत्रसंचालन अभय सहस्रबुद्धे यांनी केले.

माजी मंत्री सुनील तटकरे यांना श्रेय

परशुराम येथे शुक्रवारी सायंकाळी उशिरा हा कार्यक्रम झाला. हा शासकीय कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले. मात्र याचे निमंत्रण स्थानिक सरपंच, ग्रामस्थ, पं. स. सदस्य यांना देखील देण्यात आले नव्हते. कार्यक्रमाची शोभा वाढावी म्हणून हे लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले असे त्यांनी सांगितले. यावेळी तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी बजेटमध्ये 10 कोटी या देवस्थानाला देण्यासाठी तरतूद केली. त्याचा पहिला टप्पा पूर्ण होत असल्याचे सांगण्यात आले आणि तटकरे यांना धन्यवाद देण्यात आले.