Fri, Apr 26, 2019 00:06होमपेज › Konkan › सावंतवाडीत लवकरच प्लास्टिक रिसायकलिंग प्रकल्प

सावंतवाडीत लवकरच प्लास्टिक रिसायकलिंग प्रकल्प

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 03 2018 8:17PMसावंतवाडी ः प्रतिनिधी 

सावंतवाडी नगरपरिषदेकडून प्लास्टिक मुक्तीवर नवा प्रकल्प आणण्याचा मानस व्यक्त केला आहे. शहरातील प्लास्टिकवर  प्रक्रिया करणारा प्लास्टिक रिसायकलिंग प्रकल्प लवकरच सावंतवाडी नगरपरिषदेच्या कार्यालयानजीक असलेल्या अग्निशामक दलाच्या इमारतीच्या जागेत मशीन बसविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दिली.

सुंदर व स्वच्छ सावंतवाडी शहरासाठी प्लास्टिक प्रक्रिया  करणार्‍या प्रकल्पातून प्लास्टिक कचरा गोळा करून तो या मशीनमध्ये टाकला जातो. त्याचे रिसायकलिंग करून प्लास्टिकचे रस्ते तसेच अन्य कामांमध्ये त्याचा वापर केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याद्वारे नगरपरिषदेचे उत्पन्नही  वाढवून रोजगारालाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्लास्टिक मुक्तीबरोबर कचरा निर्मूलन आणि कचर्‍यावरून खतनिर्मिती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. मत्स्य खत प्रकल्पाची व्याप्ती वाढवून दोन टन करण्यात येणार आहे. सध्या मत्स्य खताची मशीन ही शहरातील फिश मार्केटच्या येथे बसवण्यात आलेली आहे. कार्वे येथील डंपिंग ग्राऊंडवर कचरा न टाकता त्याठिकाणी कचर्‍यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्याचाही प्रस्ताव त्यांनी यावेळी असल्याचे सांगितले. ठराविक प्रकारचे प्लास्टिक वगळून अन्य सर्व प्रकारचे प्लास्टिक हे या रिसायकलिंग मशीनमध्ये टाकून त्याद्वारे तयार झालेल्या मळीपासून वेंगुर्ला नगरपरिषदेच्या असता तयार करण्याच्या प्रकल्पाप्रमाणे या प्लास्टिकचा वापर करता येऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.