Sun, May 26, 2019 21:35होमपेज › Konkan › ‘पीओपी’ मूर्तींवर बंदी घातल्यास कोटीची उलाढाल होणार ठप्प!

‘पीओपी’ मूर्तींवर बंदी घातल्यास कोटीची उलाढाल होणार ठप्प!

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 22 2018 11:02PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनविण्या कामावर अनेक लोकांचा रोजगार सुरू आहे. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी घातल्यास लोकांचा रोजगार बंद होणार असून सुमारे 1 कोटीची उलाढालही थांबणार आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विक्रीवर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात येवू नये, अशी मागणी या मूर्ती बनविणार्‍या आणि विक्री करणार्‍या व्यावसायिकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे पाण्याचे प्रदूषण होत असून पर्यावरणाला धोका असल्याने या मूर्तींवर जिल्ह्यात बंदी घालण्याची मागणी श्री गणेश मूर्तिकार संघटनेने केली होती. दरम्यान, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍यांनी एकत्र येत नुकतीच जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी कृष्णकांत घोगळे, अविनाश कोळंबकर यांच्यासह पीओपी मूर्ती व्यवसायिक उपस्थित होते.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विसर्जित होत नसल्याचा श्री गणेश मूर्तिकार संघटनेने केलेला आरोप पूर्णतः खोटा व मानसिक नैराश्यातून केला असल्याचा आरोपही पीओपी व्यवसायिकांनी केला आहे. मातीची टंचाई लक्षात घेता हा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा पर्याय लोकांना खुला राहणार आहे. 

या व्यवसायामुळे अनेक लोकांचा उदरनिर्वाह होत आहे. तसेच या व्यवसायातून जिल्ह्यात कोटींची उलाढाल होत आहे. या व्यवसायात काम करणार्‍या जनतेच्या उदर निर्वाहाचा विचार करता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात येवू नये, अशी मागणी या पीओपी व्यावसायिकांनी केली आहे.

 

Tags : Sindhudurg, Sindhudurg news, Plaster Paris, idol, ban,