Thu, Apr 25, 2019 17:49होमपेज › Konkan › पिकुळे- उसप परिसरातील गावाना मिळणार तिलारीचे पाणी

पिकुळे- उसप परिसरातील गावाना मिळणार तिलारीचे पाणी

Published On: Feb 10 2018 11:17PM | Last Updated: Feb 10 2018 10:39PMसाटेली-भेडशी : वार्ताहर 

दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाचे पाणी पोटकालव्यां अभावी  काही गावाना मिळत नव्हते. ही समस्या सोडविण्यासाठी येत्या दहा दिवसांत या गावांचा गुगल सर्व्हे करण्यात येणार आहे.याबाबतची बैठक शुक्रवारी सिंधुदुर्गनगरी येथे प्रमुख अधीक्षक अभियंता एम. जे. नाईक यांच्या उपस्थितीत झाली.

या समस्ये संदर्भात पिकुळे- उसप परिसरातील ग्रामस्थांनी 25 जानेवारी रोजी उपोषण केले होते.या पार्श्‍वभूमीवर अधीक्षक अभियंता एम. जे. नाईक,  दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ   यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. बैठकीला उसप, खोक्रल, पिकुळे, खानयाळे तसेच आंबडगाव, वझरे, माटणे, गिरोडे, घोटगेवाडी, मोर्ले, केर,सोनावल,पाळये, मेढे ग्रामस्थ, पाटबंधारे प्रकल्प मंडळ सिंधुदुर्ग, कार्यकारी अभियंता राजन डवरी, तिलारीचे उपअभियंता श्री. चव्हाण, श्री. बर्डे,प्रकाश गवस, जिल्हा बँक संचालक  मायकल लोबो, मनसे उपतालुकाप्रमुख गोपाळ गवस, माजी उपसरपंच मोर्ले, साटेली भेडशी सरपंच नामदेव धर्णे, शंकर केसरकर, विनायक सावंत, नितीन मोर्ये आदी शेतकरी बांधव उपस्थित होते. बैठकीत तालुक्यातील उसप, खोक्रल, पिकुळे, खानयाळे तसेच आंबडगाव, वझरे, माटणे, गिरोडे,घोटगेवाडी, मोर्ले, केर, सोनावल, पाळये, मेढे या गावातील पाणीटंचाईच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली.  या संबंधित गावाचे गुगलद्वारे सर्वेक्षण येत्या आठ दिवसात करून पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये खासगी एजन्सीद्वारे निविदा ट्रेंडर्स प्रक्रिया करून प्रत्यक्ष जागेचा सर्व्हे शेतकर्‍यांना सोबत घेऊन करण्यात येईल. ज्या-ज्या गावांना ग्रॅव्हिटी तंत्राने पाणी उपलब्ध करणे शक्य आहे तेथे  जागा संपादीत करून वनजमीन असल्यास वनप्रस्ताव करून या गावांना पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.