Sun, Sep 23, 2018 23:29होमपेज › Konkan › पेट्रोलियम मंत्र्यांचे नाणारबाबत ‘तोंडावर बोट’

पेट्रोलियम मंत्र्यांचे नाणारबाबत ‘तोंडावर बोट’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शृंगारतळी : वार्ताहर

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी नाणार प्रकल्पाबाबत बोलण्याचे  टाळले. यामुळे कोकणातील जनतेत या प्रकल्पाविषयी संभ्रम वाढण्याची शक्यता आहे. पत्रकारांनी विचारलेल्या नाणार प्रश्‍नाबाबत केंद्रीय मंत्र्यांनी आपल्याला याबाबत काहीच कल्पना नाही, असे उत्तर पत्रकार परिषदेत दिले.

केंद्रीय मंत्री ना. धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी अंजनवेल येथील ‘गेल’ प्रकल्पस्थळाला भेट दिली व ‘गेल’च्या वायूवाहक जहाजाचे एलएनजी टर्मिनल जवळ स्वागत केले. त्यानंतर प्रकल्पाची अधिकार्‍यांकडून माहिती घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी नाणार रिफायनरीबाबत प्रश्‍न विचारला असता, आपल्याला याविषयी काही माहिती नाही, असे ना. प्रधान म्हणाले. 
जर आयात केलेला गॅस हा शुद्ध स्वच्छ व कमी किंमत असलेले इंधन असल्याचे सांगण्यात येते तर मग ‘आरजीपीपीएल’मधून फक्‍त 500 मेगावॅटच वीज उत्पादन का होते? पत्रकारांच्या या प्रश्‍नावरही ना. प्रधान यांनी “ही व्यापारी नीती आहे” एवढेच उत्तर दिले.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री कोकण दौर्‍यावर असताना कोकणातच येणार्‍या नाणार रिफायनरी प्रकल्पाविषयी ते काहीच बोलले नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाला केंद्राचा पाठिंबा असल्याच्या उलटसुलट चर्चांना वेग येणार आहे. नाणार प्रकल्पाला तेथील स्थानिक जनतेने व राजकीय पक्षांनी विरोध सुरू केला आहे. त्यामुळे कोकण दौर्‍यावर आलेल्या पेट्रोलियम मंत्री ना. प्रधान यांनी या प्रकल्पाविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी कोकणातील जनतेचा भ्रमनिरस केला आहे.

Tags :  Konkan, Konkan News,  Petroleum, Minister, silent, Nanar, question


  •