Sat, Apr 20, 2019 23:53होमपेज › Konkan › लोकाभिमुख कारभार करणार

लोकाभिमुख कारभार करणार

Published On: May 03 2018 1:29AM | Last Updated: May 02 2018 10:50PMगुहागर : प्रतिनिधी

येथील दुर्गादेवी गुहागरचे वैभव आहे. या देवस्थानाने येथील वारसा जपण्याचे काम केले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष म्हणून आपण गुहागरसाठी लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभार करू, असे गुहागरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.  दुर्गादेवी देवस्थानाचा 11 वा वर्धापनदिन नुकताच झाला.  यावेळी नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक अमोल गोयथळे,अरुण रहाटे, उमेश भोसले, गजानन वेल्हाळ, समीर घाणेकर, माधव बोले, मनाली सांगळे, स्नेहा सांगळे, वैशाली मालप, स्नेहा भागडे, भाग्यलक्ष्मी साटले, प्रणीता साटले आदी नगरसेवक ,देवस्थानाचे अध्यक्ष किरण खरे, गणेश भिडे, संतोष मावलणकर, आनंद खरे, अतुल फडके स्नेहा खरे आदी उपस्थित होते. 

यावेळी नगराध्यक्ष बेंडल म्हणाले, या देवस्थानाने सामाजिक, पर्यटन, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात योगदान दिले आहे. त्यामुळे गुहागरच्या विकासात आपण या संस्थेला बरोबर घेऊन काम करू. शहर विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून आदर्शवत काम करु, येथील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी प्राधान्य देऊ,  हा कारभार पारदर्शक करू, असे सांगितले. यावेळी देवस्थानाचे अध्यक्ष किरण खरे यांनी जनतेने नगराध्यक्ष म्हणून योग्य माणसाची निवड केली आहे. एक प्रामाणिक माणूस शहरासाठी लाभला आहे. त्यांना नगरसेवकांचा पण पाठिंबा आहे. त्यामुळे बेंडल गुहागरच्या विकासात यशस्वी होतील, असा विश्‍वास व्यक्‍त केला. उपस्थित नगरसेवकांनी मनोगत व्यक्‍त केले.

Tags : Konkan, People, will, take, over