Thu, Nov 15, 2018 22:56होमपेज › Konkan › मुख्यमंत्र्यांचा ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ पर्यायही अयशस्वी 

मुख्यमंत्र्यांचा ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ पर्यायही अयशस्वी 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दोडामार्ग : प्रतिनिधी

आरोग्याच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले जनआक्रोश आंदोलन बुधवारी नवव्या दिवशी सुरूच होते. आमरण उपोषणाला बसलेले वैभव इनामदार यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान बुधवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला ‘डायरेक्ट  बेनिफिट ट्रान्सफर’ चा पर्याय आंदोलकानी अमान्य करत  ठोस लेखी निर्णय  हाती येत नाही तोवर उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा दिला.

गेले नऊ दिवस तालुकावासीय हे आंदोलन ठेडत आहेत. दिवसेंदिवस बहुसंख्येने महिला आंदोलनात सहभागी होत असून आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. पण महाराष्ट्र सरकार या आंदोलनावर अद्याप यशस्वी तोडगा काढू शकलेले नाही. आता आंदोलनकर्त्या महिलांची सहनशक्ती संपली असून जर महाराष्ट्र सरकारने यशस्वी तोडगा मागण्यांवर काढला नाही तर निश्‍चितपणे सर्व हजारो महिला गुरूवारी किंवा शुक्रवारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा बुधवारी महिलांच्यावतीने देण्यात आला.मंळवारी रात्री कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालक श्री. धारूरकर यांनी भेट दिली. यावेळी संयोजक आणि त्यांच्यात बरीच चर्चा झाली. पण सकारात्मक काही निर्णय झाला नाही. 

शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खा. विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांचा निरोप आणि महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांच्याशी चर्चेअंती ठरलेल्या निर्णयाची माहिती सांगितली. ते म्हणाले,  आपल्या सरकारने डायरेक्ट बेनिफीट ट्रान्फर योजना लागू केली असून गुरूवारी याबाबत शासन निर्णय बाहेर पडेल. या निर्णयात गोव्यात जाणार्‍या सिंधुदुर्गातील रूग्णाला प्रत्येक दिवशी येणारा खर्च त्याच्या खात्यात जमा होईल. याबाबत गोव्यामध्ये एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल. ही माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. पण आंदोलक मागण्यांवर ठाम राहीले. नऊ दिवस आंदोलन सुरू असून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी साधी भेट दिली नाही याबाबत नाराजी व्यक्त केली. लवकरच आंदोलनस्थळी आरोग्यमंत्री येतील, असे आश्‍वासन धुरी यांनी दिले. 

 

Tags : Dodamarg, Dodamarg news, health demand, agitation,


  •