होमपेज › Konkan › रत्नागिरी येथे नेत्र, अवयवदानाची जनजागृती

रत्नागिरी येथे नेत्र, अवयवदानाची जनजागृती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

अवयवदान, मरणोत्तर नेत्रदानाबद्दल जनजागृती व्हावी, यासाठी मुंबईच्या अवयव व देहदान महासंघाने पदयात्रा काढली. मुंबई ते गोवा पदयात्रा रत्नागिरी येथे दाखल झाली होती. पदयात्रेला रत्नागिरीकरांचा प्रतिसाद मिळाला.अनेकांनी अवयवदान, देहदान करण्याची इच्छा प्रकट करून अर्जही भरले. रत्नागिरीत यात्रेचे जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्वागत केले. अवयवदान मोहीम जास्तीत लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता 60 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन पदयात्रा सुरू केली आहे. अवयवदान, देहदान करण्याची मानसिकता वाढली पाहिजे, हे पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

मुंबईच्या केईएम रुग्णालयाजवळून 23 फेब्रुवारीला पदयात्रेस सुरवात झाली. विविध टप्पे पार करत गणपतीपुळे, शिरगावमार्गे पदयात्रा रत्नागिरी येथे आली. परटवणे येथे पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्यलक्ष्मी चौक, गोखले नाका, मारुती आळी, एसटी स्टँड, जयस्तंभमार्गे जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत पदयात्रा काढली. यामध्ये दी यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लायनेस क्लब ऑफ रत्नागिरीचे सदस्य शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी सहभागी झाले. पदयात्रेची सांगता 15 रोजी मडगाव-गोवा येथे होणार आहे. पदयात्रेत पुरुषोत्तम पवार, सुनील देशपांडे, चंद्रशेखर देशपांडे, शैलेश देशपांडे, प्रियदर्शन बापट, नारायण म्हसकर, दत्तात्रय कुलकर्णी, रणजित उंदरे, शरद दाउदखानी, प्रमोद पवार आदी सहभागी झाले होते.

Tags : Konkan, Konkan News, Pedestrian rally, Posthumous, eye donation, organ donation, Ratnagiri 


  •