Thu, Mar 21, 2019 11:45होमपेज › Konkan › मंगला एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाचा मृत्यू 

मंगला एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाचा मृत्यू 

Published On: Aug 04 2018 10:55PM | Last Updated: Aug 04 2018 10:31PMचिपळूण : खास प्रतिनिधी 

मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मणदास गुप्ता (वय 65, रा. आग्रा, उत्तर प्रदेश) असे त्यांचे नाव आहे. पार्वती लक्ष्मणदास गुप्ता आणि पती लक्ष्मणदास हे गोव्याहून दिल्लीला चालले होते.  कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासादरम्यान मंगला एक्स्प्रेस रत्नागिरी येथे आली असता पती लक्ष्मणदास हे पत्नीला सांगून झोपले होते.  ही गाडी चिपळूण स्थानकाजवळ आली असता ते उठले नाहीत म्हणून पत्नीने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र,  त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर  त्यांना तत्काळ चिपळूण रेल्वे स्थानकाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तेथील डॉ. मदार यांनी त्यांना  ते मृत झाल्याचे घोषित केले.