होमपेज › Konkan › पंचायत राज समिती आजपासून रत्नागिरीत

पंचायत राज समिती आजपासून रत्नागिरीत

Published On: Apr 25 2018 10:41PM | Last Updated: Apr 25 2018 10:41PMरत्नागिरी : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या महाराष्ट्र विधान मंडळाची पंचायत राज समिती दि. 26 ते 28 एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. पंचायत राज समितीचे प्रमुख आ. सुधीर पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 28 आमदारांची समिती तीन दिवस रत्नागिरी दौर्‍यावर येत आहे.

सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषद सभागृहामध्ये सन 2012-13 च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदाच्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष होणार आहे. दि. 27 एप्रिल रोजी सकाळी 9 पासून पंचायत राज समितीमधील सदस्य जिल्ह्यातील पंचायत समिती, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळांना भेटी देणार असून यावेळी गटविकास अधिकारी व संबंधित अधिकार्‍यांची प्रश्‍नावली क्रमांक दोनच्या संदर्भात साक्ष होणार आहे. 

दि.28 एप्रिल रोजी सन 2013-14 वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष जिल्हा परिषद सभागृह येथे सकाळी 10 पासून होणार आहे. आमदारांसाठी संपर्क अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याची माहिती जि. प. प्रशासनाकडून देण्यात आली आहे.