Sun, Aug 25, 2019 03:39होमपेज › Konkan › हक्क मिळविण्यासाठी आमचा लढा : अ‍ॅड. सुहास सावंत

हक्क मिळविण्यासाठी आमचा लढा : अ‍ॅड. सुहास सावंत

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:30AMकुडाळ : वार्ताहर

शांततेच्या मार्गाने शासनाला आरक्षण द्यायचे असते तर आतापर्यंत शासनाने ते दिले असते. मात्र आता शांत राहून, निवेदने अधिकार्‍यांच्या गाठीभेटी घेवून आरक्षण मिळणार नसून आरक्षण मिळण्यासाठी तलवार बाहेर काढण्याची हीच वेळ आहे. आपण गीनिस बुकात नोंद होण्यासाठी मोर्चे काढले नसून आमचा हक्क मिळवण्यासाठी लढा पुकारला आहे. संपूर्ण महाराष्ट्र आरक्षणाबाबत पेटलेला असून सिंधुदुर्ग यात मागे नाही. हे शासनाला दाखवून देण्यासाठी गुरूवार 26 जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बंदचा एकमुखी निर्णय मराठा समाजाच्यावतीने कुडाळात घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. सुहास सावंत यांनी अत्यावश्यक सुविधा वगळून आपण सुपूर्ण जिल्हाला या बंद हाक दिल्याची माहीती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा मराठा समाजाच्यावतीने जाहीर निषेधाचा ठराव घेण्यात आल्याचे सांगितले.  तसेच या बंदला आ. नितेश राणे व आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवल्याचेही अ‍ॅड.सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्गच्या बैठकीत  न्यायासाठी मराठा वेळप्रसंगी केसेस घेण्यास तयार आहे असा संतप्त सूरही उमटला. मुख्यमंत्री यांनी पंढरपूर वारीत मराठ्यांसाठी केलेल्या वक्तव्याचा यावेळी ठराव घेवून निषेध करण्यात आला. काल व आज मराठा बांधवानी केलेल्या आंदोलनाबाबत अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. एकत्र लढा दिल्यास यश दूर नाही, असा सूरही उमटला. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी मंगळवारी मराठा समाज हॉल  येथे बैठक  आयोजित केली होती  अशोक सावंत, धीरज परब, विक्रांत सावंत, विनायक राणे, राजू राऊळ, जान्हवी सावंत तसेच जिल्ह्यातून मराठा बांधव-भगिनी उपस्थीत होत्या.

आ. वैभव नाईक म्हणाले, आता न्याय्य हक्कासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. राजकारणवीरहित हे आंदोलन आहे. मोठ्या संख्येने या आंदोलनात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे असे सांगितले. आ. नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्र पेटून उठला असताना आपण गप्प का? मराठा आता न्याय्य हक्कासाठी पेटून उठला पाहिजे, असे म्हणाले. 2014 मध्ये  एक मराठा लाख मराठा मुख मोर्चा झाला नारायण राणेंच्या माध्यमातून आम्हाला 16 टक्के आरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अनेक नेत्यांनी यासाठी सातत्याने लढा दिला. प्रत्येक जिल्ह्यात राज्य मागास आयोग पोचला. पुरावे गोळा करण्यासाठी आपण त्यावेळी आक्रमकपणे पावूल टाकले पाहिजे असे सुहास सावंत यांनी सांगितले. देवगडचे निशिकांत साटम यानी आंदोलन सात्विक पद्धतीने करावे. मराठा म्हणून जागतिक पातळीवर शांत म्हणून पोचला. आपल्या मोर्चाचे गाड्या फोडणे हे आंदोलन मी मानत नाही. कणकवलीचे सुशील सावंत यांनी शांततेने जर काही मिळत नाही तर आक्रमकपणासुद्धा महत्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांनी  साप सोडण्याचे केलेले वक्तव्य याचा आम्ही निषेध करतो. निषेधाचा ठराव घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यांचे  बालिश विधान आहे. एक मराठा लाख मराठा घोषणा करण्यात आली. एकाच वेळी जिल्हा बंद करा. धीरज परब म्हणाले, आगामी काळातील आंदोलनाचे नियोजन करूया, असे सांगितले. रुद्र परब या चिमुकल्याने आरक्षणाबाबत बोलताना उठ मराठा जागा हो, असे आवाहन केले. संध्या तेर्से यांनी आपल्या भावंडांसाठी लढले पाहिजे. अशोक सावंत यांनी अन्यायाच्या विरोधात आपण एकत्रित लढा दिला पाहिजे, असे सांगितले. मनीष दळवी यांनी आता अधिकारी नको निवेदने नको सरळ रस्त्यावर उतरुया, असे आवाहन केले. 

विक्रांत सावंत म्हणाले, त्यावेळी राजमातांनी मराठा मोर्चाला पाठिंबा दिला आहे. वेळप्रसंगी रेलरोको करून दिल्लीला जागे करून सरकारला जागे करूया. जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळप्रसंगी टाळे टोकू यासाठी केसेस झाल्या तर आम्ही त्याची पर्वा करणार नाही. आंदोलन उग्र झाले पाहिजे असे सांगितले. थंड डोक्याने खूप झाले आता गरम झाल्याशिवाय पर्याय नाही. पोलिसांनी मराठयांच्या नादी लागु नये, असा इशारा कृष्णा सावंत यांनी दिला. सुरुवातीला राजमाता सत्वशीला भोसले तसेच मराठा बांधव काकासाहेब शिंदे याना श्रध्दांजली वाहण्यात आली.