Fri, Sep 21, 2018 15:18होमपेज › Konkan › ‘जनआक्रोश आंदोलन’ समर्थनार्थ शिवसेना आमदारांची घोषणाबाजी

‘जनआक्रोश आंदोलन’ समर्थनार्थ शिवसेना आमदारांची घोषणाबाजी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ओरोस ; प्रतिनिधी

दोडामार्गवासीयांनी पुकारलेल्या आरोग्यासाठी जनआक्रोश आंदोलनाकडे शासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांच्या सह सेनेच्या अन्य काही आमदारांनी मंगळवारी विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधले. सिंधुदुर्गातील रुग्णांवरील उपचाराचे आकारले जात असलेले शुल्क रद्द करावे व गोव्यातील सरकारी रुग्णालयामध्ये सिंधुदुर्गातील रुग्णांना मोफत उपचार मिळावेत याकरिता दोडामार्गमधील जनतेने 20 मार्च  पासून जन आक्रोश आंदोलन सुरु केले आहे. आरोग्याच्या विविध मागण्यांकरिता आरोग्याचा जनआक्रोश ही समिती स्थापन करण्यात आली.

गेले 8 दिवस हे आंदोलन विविध शांततापूर्ण मार्गांनी चालू असूनही यावर अजूनही काही उपाययोजना होऊ शकली नाही. बांबुळी येथे सिंधुदुर्गातील रुग्णांना मोफत सेवा मिळावी, दोडामार्ग रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, माकडतापच्या रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, दोडामार्गमध्ये मेडिकल कॉलेज व्हावे अशा आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आहेत. या सर्व समस्यांबाबत आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करून त्यांनी ज्या मागण्यांसाठी आंदोलन  केले आहे त्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी देखील मागणी यावेळी आ. वैभव नाईक यांच्यासोबत आ. राजन साळवी, आ. तृप्ती सावंत, आ. सदानंद चव्हाण यांनी विधानभवनच्या पायर्‍यांवर घोषणा देऊन शासनाकडे केली.
 


  •