Sun, Apr 21, 2019 01:57होमपेज › Konkan › महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकार्‍यांचे काम बंद आंदोलन

महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकार्‍यांचे काम बंद आंदोलन

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 11:13PMओरोस :  प्रतिनिधी

 नियमबाह्य कामांसाठी अधिकार्‍यांवर होणारे आरोप, धक्‍काबुक्‍की, उपमुख्य कार्यकारी दर्जाच्या अधिकार्‍यांना हल्‍ला झाल्याच्या घटना ताज्या असताना इंदिरा आवास घरकुल याद्यांसाठी समाजकंटकांनी परांडा गटविकास अधिकार्‍यांना धक्‍काबुक्‍की करून अमानुष मारहाण केली. अशा प्रकरातून महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकार्‍यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. त्यामुळे सर्व अधिकार्‍यांनी बेमुदत कामबंद आंदोलन राज्यभर सुरू केले आहे. याबाबत लक्ष न दिल्यास 28 रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.