Thu, Jun 20, 2019 01:03होमपेज › Konkan › ओरोस येथे पावणेतीन लाखांची गोवा दारू जप्त

ओरोस येथे पावणेतीन लाखांची गोवा दारू जप्त

Published On: Jul 20 2018 11:24PM | Last Updated: Jul 20 2018 10:23PMओरोस : प्रतिनिधी

ओरोस-खर्येवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ 2 लाख 70 हजार किमतीचे गोवा बनावटीचे 100 बॉक्स दारू व टेम्पोसह 7 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. यासह देवगड, साटेली, दोडामार्ग येथे ही गोवा बनावटीची दारू व रेल्वेत चोरीस गेलेल्या मोबाईल प्रकरणाचा छडा लावण्यातही यश आले आहे.

खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या पथकाने ओरोस- खर्येवाडी पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून पोलिसांनी गोवा बनावटीची 2 लाख 70 हजार रुपये किंमतीची दारू जप्त केली. यामध्ये गोल्ड अ‍ॅण्ड ब्लॅक थ्री एक्स रमचे 50 बॉक्स व गोल्डन एस लेबलचे 100 बॉक्स यासह अवैध दारू वाहतूक करणारा टाटा टेम्पो असा एकूण 7 लाख 70 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत आरोपी विरूध्द सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवीराज फडणीस, पोलिस फौजदार खंदारे, पोलिस काँ. कांदळगावकर, सरमळकर, तेली यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 साटेली-भेडशी येथेही पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये 5 हजार 640 रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली.  पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  पो.काँ. सुधीर सावंत, आशिष गंगावणे, मनोज राऊत, अनिल धुरी, अनुपकुमार खंडे, प्रवीण वालावलकर यांनी ही कारवाई केली.

देवगडमधील केळकर महाविद्यालयातून चोरीस गेलेल्या मोबाईचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या मोबाईल चोरीचा छडाही पोलिसांनी लावला आहे. गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1999 पासून फरार असलेला खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपातील बोरिवली येथे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी दिली आहे.