Fri, Apr 26, 2019 17:42होमपेज › Konkan › रत्नागिरीत आज ओबीसी महासंमेलनाचे आयोजन

रत्नागिरीत आज ओबीसी महासंमेलनाचे आयोजन

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 10:57PMरत्नागिरी : प्रतिनिधी

अखिल भारतीय ओबीसी महासभातर्फे आयोजित राज्यस्तरीय ओबीसी महासंमेलन दि. 13 फेब्रुवारी रोजी माध्यमिक शिक्षक पतपेढी हॉल, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे होणार आहे. महासभेचे अध्यक्ष ललितकुमार यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

या संमेलनात अनेक ओबीसी संघटना प्रथमच रत्नागिरीमध्ये एका विचार मंचावर एकत्र येणार आहेत. यावेळी ओबीसी समाजातील जिल्ह्यातील सर्व संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.