Sun, Jul 21, 2019 08:40होमपेज › Konkan › रायपाटण येथे जिल्हास्तरीय पालखीनृत्य स्पर्धेचे आयोजन

रायपाटण येथे जिल्हास्तरीय पालखीनृत्य स्पर्धेचे आयोजन

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 8:34PM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

रायपाटणचे ग्रामदैवत असलेल्या वडचाई मंदिराच्या उद्घाटन समारंभानिमित्त जिल्हास्तरीय पालखीनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम तीन क्रमांक पटकावणार्‍या संघाला आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. दि.3 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत रायपाटण गावचे ग्रामदैवत वडचाई मातेच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा पार पडत असून या तीन दिवसांत अनेक विधीवत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 

पहिल्या दिवशी जिल्हास्तरीय पालखीनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा वडचाई मंदिराच्या आवारात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील सहभागी सर्व संघांना त्या दिवशी सात वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे क्रमप्राप्त आहे.  या स्पर्धेसाठी सहभाग घेऊ इच्छीणार्‍या संघांनी आपली नावे दिनांक 26 जानेवारीपूर्वी  विठ्ठल पांचाळ,अशोक चांदे, जनार्दन गांगण यांच्याकडे नोंद करायची आहेत. या स्पर्धेतील सहभागी संघांसाठी नियमावली असेल व त्याची प्रत संबंधित संघांना दिली जाणार आहे. रायपाटणमध्ये आयोजित या जिल्हास्तरीय स्पर्धेला ढोलवादन व पालखी नृत्य संघांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन स्पर्धा आयोजकांनी केले आहे.