Sat, Sep 22, 2018 04:48होमपेज › Konkan › नाणारला प्रकल्पाला विरोधच

नाणारला प्रकल्पाला विरोधच

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 9:54PMमुंबई : प्रतिनिधी

नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असून, याबाबत मुख्यमंत्र्यांनी विश्‍वासघात केल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नाणार प्रकल्पाला शिवसेनेने पहिल्यापासून विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक मंडळींनी केलेल्या आंदोलनालाही शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. मात्र, बुधवारी शिवसेनेला अंधारात ठेवून या प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. त्यावर शिवसेनेने पत्रक प्रसिद्ध करून आपला विरोध कायम असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

नाणारसारखा विनाशकारी प्रकल्प लादणार नाही, स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प कोकणच्या भूमीत येणार नाही, अशी ग्वाही  मुख्यमंत्र्यांनी  दिली होती. तरीही हा प्रकल्प लादण्यात आला. हा विश्‍वासघात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत किंमत राहिलेली नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. स्थानिकांचा विरोध डावलून शिवसेना हा प्रकल्प होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. 

Tags : Konkan, Opposition, Nanar, project