होमपेज › Konkan › अव्वल राहण्याची परंपरा कोकण बोर्ड  कायम राखणार?

दहावीचा आज निकाल; इथे चेक करा

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 1:22AMरत्नागिरी ः शहर वार्ताहर

राज्यात मार्च महिन्यात झालेल्या दहावीच्या परीक्षेचा शुक्रवार दि. 8 रोजी ऑनलाईन निकाल लागणार आहे. कोकण बोर्डातून 38 हजार 989 विद्यार्थी या परीक्षेला बसले होतेे. गत सहा वर्षे कोकण बोर्ड राज्यात अव्वल राहिले आहे. यावर्षीही ही परंपरा कायम राखणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शैक्षणिक वाटचाल ठरवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा म्हणून दहावीच्या परीक्षेकडे पाहिले जाते. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून 26 हजार 215 विद्यार्थी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 11 हजार 934 विद्यार्थी प्रथम परीक्षार्थी म्हणून प्रविष्ठ झाले होते. रत्नागिरीतून 591 तर सिंधुदुर्गमधून 249 पुनर्परिक्षार्थी या परीक्षेला बसले होते. एकूण विद्यार्थ्यांमध्ये रत्नागिरीतून 13 हजार 753 विद्यार्थी, 12 हजार 577 विद्यार्थिनी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 6 हजार 760 विद्यार्थी आणि 5 हजार 899 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली.  रत्नागिरीत 72 आणि सिंधुदुर्गात 41 अशा एकूण 113 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.  

बारावीच्या निकालात कोकण बोर्डाने अव्वल राहण्याची परंपरा कायम राखली आहे. यावर्षीही ही परंपरा कायम राखणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इयत्ता दहावीच्या मार्च 2018 च्या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले निकाल www.mahresult.nic.in/ www.sscresult.mkcl.org/www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावरून उपलब्ध होतील. परीक्षेचा निकाल एसएमएसद्वारे मोबाईलवरून बीएसएनएल धारकांसाठी 57766  या  क्रमांकावर  MHSSC