Wed, Apr 24, 2019 19:33होमपेज › Konkan › ऑनलाईन फसवणूक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

ऑनलाईन फसवणूक; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Published On: Jan 26 2018 12:26AM | Last Updated: Jan 26 2018 12:07AMरत्नागिरी : प्रतिनिधी

बँकेच्या कॅशबॅक फॅसिलिटी अ‍ॅक्टिव्हेट सेक्शनमधून बोलत असून ही सेवा अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी एटीएम कार्डचा सीव्हिसी नंबर व ओटीपी नंबरची मागणी करुन खात्यातील 48 हजार 216 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मंगेश दत्तात्रय बापट (49, रा. काविळतळी, चिपळूण) यांनी याबाबत रत्नागिरी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मंगेश बापट हे भारत संचार निगम लि. ग्राहक सेवा केंद्र चिपळूण येथे नोकरीला आहेत. 

कामानिमित्त ते 20 जानेवारी 2018 रोजी रत्नागिरीत आले होते. तेव्हा त्यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरुन फोन आला. फोन करणार्‍याने मी बँकेच्या कॅशबॅक फॅसिलिटी अ‍ॅक्टिव्हेट सेक्शनमधून बोलत असून ही सेवा अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी एटीएम कार्डचा सीव्हीसी नंबर व ओटीपी नंबरची बापट यांच्याकडे मागणी केली.त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवत बापट यांनी त्याला सीव्हीसी नंबर व ओटीपी नंबर दिला. त्यानंतर बापट यांच्या मोबाईलवर त्यांच्या खात्यातून 48 हजार 216 रुपयांची ऑनलाईन खरेदी केल्याचा मेसेज आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत बुधवारी रात्री 10 वा. त्यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी करत आहेत.