Wed, Apr 24, 2019 21:29होमपेज › Konkan › कर्जमाफीसाठी तालुकास्तरावर ऑनलाईन अर्जाची सुविधा

कर्जमाफीसाठी तालुकास्तरावर ऑनलाईन अर्जाची सुविधा

Published On: Mar 24 2018 1:50AM | Last Updated: Mar 23 2018 9:09PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 24 जुलै 2017 ते 20 सप्टेंबर 2017 या कालवधीत शेतकर्‍यांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात आले होते. तथापि या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत काही शेतकर्‍यांना वैयक्‍तिक अथवा तांत्रिक कारणामुळे विहित दिनांकापर्यत ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत.  

जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी  सन्मान योजना 2017 करता ज्या शेतकर्‍यांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीही यापूर्वी सदर योजनेसाठी अर्ज केलेला नाही अशा शेतकर्‍यांसाठी 31 मार्च 2018 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन अर्ज भरणेकरिता आपले सरकार या पोर्टलवरील लिंक ओपन करुन देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेणेकरिता ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे.

अर्ज भरणेची अंतिम तारीख 31 मार्च 2018 ही आहे. https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर अर्ज भरणा करता येतील. अर्ज भरणार्‍यांचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. शेतकरी सभासदांना आपले अर्ज जिल्ह्यातील महा ई - सेवा  केंद्र, आपले सरकार केंद्रामध्ये ऑनलाईन अर्ज भरणा करता येतील. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा मध्य. सह. बॅक लि. चे तालुका विकास अधिकारी यांचे शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेंतर्गत एकरकमी परतफेड योजनेच्या लाभासाठी रु. 1.50 लाखावरील त्यांच्या हिश्श्याची रक्‍कम 31 मार्च 2018 पूर्वी संबंधित बँकेत/ विकास सोसायटी भरणा करुन एकरकमी परतफेड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहाकारी संस्था, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

 

Tags : Sindhudurg, Sindhudurg news, Debt relief, Online application,